पुणे : अवैध मद्यविक्री; हॉटेलवर छापा | पुढारी

पुणे : अवैध मद्यविक्री; हॉटेलवर छापा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बारमध्ये बसून एक एक घोट घेणे परवडत नसल्याने अनेक जण बाहेरून मद्य आणून बसण्याची सोय देणारी हॉटेल शोधतात. अशाच हॉटेलवर बनावट ग्राहक बनून गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी कारवाई करीत मद्यसाठा जप्त केला.

पुणे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांना खबर्‍यामार्फत माहिती मिळाली, की पुणे-नाशिक मार्गावरील वडगाव आनंद गावाच्या हद्दीत असलेल्या सानवी नावाचा हॉटेलचालक त्याच्या हॉटेलवर मद्यपींना अवैधरीत्या मद्य विक्री करण्याबरोबर बाहेरून मद्य आणल्यावर अनेकांना तिथे बसण्याची सोय करून देतो.

माहितीची खात्री पटल्यावर बनावट ग्राहक बनून गेलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्‍यांनी इशारा करताच अधिकार्‍यांनी पथकासह छापा मारला. या कारवाईत विदेशी मद्याचे दोन बॉक्स, खुर्च्या – टेबलसह जप्त करून हॉटेल चालक अमोल उमाप यास ताब्यात घेण्यात आले.

Back to top button