मुंबई-पुणे ‘द्रुतगती’ मार्गावर नऊ वाहनांचा अपघात | पुढारी

मुंबई-पुणे ‘द्रुतगती’ मार्गावर नऊ वाहनांचा अपघात

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर किलोमीटर 39/800 च्या दरम्यान सोमवार (दि. 13) दुपारी साडेतीनच्या सुमारास तब्बल नऊ वाहनांचा अपघात झाला. या वाहनांमध्ये वॅगन आर (एमएच 12 टीव्ही 7907), वॅगन आर (एमएच 14 इसी 2767), ह्युंदाई एक्सेन्ट (एमएच 14 एचजी 5092) ह्युंदाई एक्सेन्ट (एमएच 14 एचएन 0429) स्विफ्ट (एमएच 46 एपी 0616 बस (एमएच 14बीटी 4698) ट्रक (एमएच 46 एएफ 9160) फॉक्सवॅगन (एमएच 47 एयू 2737) आणि ह्युंदाई गाडी (एमएच 12 एलडी2055) अशा नऊ गाड्यांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी अथवा मयत झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार एका ट्रकचा (एमएच 46 एएफ 9160) ब—ेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने समोर जाणार्‍या कारला धडक दिली. ती कार समोरच्या कारवर अशा प्रकारे नऊ गाड्या एकमेकाला धडकल्या.

अपघातग्रस्त वाहनांना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स यांनी मदत केली. बोरघाट वाहतूक पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन वाहतूक सुरळीत केली. हा अपघात खोपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडला असून, खोपोली पोलिस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अपघाताची चौकशी सुरू आहे.

Back to top button