Pune Crime : आळेफाटा येथे २० वर्षीय मुलीवर अत्याचार, दोन नराधमांना अटक | पुढारी

Pune Crime : आळेफाटा येथे २० वर्षीय मुलीवर अत्याचार, दोन नराधमांना अटक

आळेफाटा (पुणे); पुढारी वृत्तसेवा : Pune Crime आळेफाटा (ता.जुन्नर जि.पुणे) पोलीस ठाणे हद्दीत एका २० वर्षीय मुलीचे घरात घुसून हातपाय बांधून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अत्याचारी नराधमांना अटक केली.

अशोक हरिभाऊ बनोटे, संदीप भिवसेन सूर्यवंशी असे अटकेतील आरोपींची नावे आहे. आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात पीडित मुलगी घरी एकटीच होती. तिच संधी साधून आरोपींनी घरात प्रवेश केला. घरात घुसून अशोक हरिभाऊ बनोटे व त्याचा एक अनोळखी साथीदार याने पीडितेला मारहाण करून कापडाने तिचे हातपाय व तोंड बांधून दोन्ही नराधमांनी आळीपाळीनं मुलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अशोक हरिभाऊ बनोटे (वय ४५, रा. श्रीरामपूर, जि अहंमदनगर)  संदीप भिवसेन सूर्यवंशी (५०, रा. बोरी बुद्रुक, ता. जुन्नर, जि पुणे) या दोन्ही नराधमांना मोठ्या शिताफीने तात्काळ अटक केली.

दोन्ही नराधमांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button