कुरकुंभ : दगड खाणीत हायवा टिपर अंगावरून गेल्याने ऑपरेटर जागीच ठार | पुढारी

कुरकुंभ : दगड खाणीत हायवा टिपर अंगावरून गेल्याने ऑपरेटर जागीच ठार

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा: वासुंदे (ता. दौंड) हद्दीतील दगड खाणीत एका ऑपरेटरच्या अंगावरून हायवा टिपर गेल्याने तो ठार झाला. हसनुर लियाकत अली (वय २८, सध्या रा. जांबले स्टोन क्रेशर, पांढरेवाडी, ता. दौंड, मुळ रा. धुलवा, पो. धुलवा, जि. मुर्शिदाबाद, राज्य पश्चिम बंगाल) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत बापु रामदास जांबले (वय ३६, रा. वासुंदे ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हायवा चालक शंकर झुंबर जांबले (रा. वासुंदे, ता. दौंड) यांच्या विरोधात रविवारी (दि. ४) दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुंदे गावचे हद्दीतील नानासो रामदास जांबले याच्या शेत गट नंबर ३३४ मधील दगडाचे खाणीत चालक शंकर जांबले भरधाव वेगाने हायवा टिपर (एमएच ४२ बीएफ ११५६) पाठीमागे घेत होते. यादरम्यान खाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपलेल्या ऑपरेटर हसनुर आली यांच्या अंगावरुन हायवा टिपर गेल्याने त्याचे डोक्यास, पोटास, पायाला किरकोळ व गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Back to top button