भोर : शेतकर्‍यांचा पीक कर्जाचा परतावा लवकरच देऊ: आमदार संग्राम थोपटे यांचे प्रतिपादन | पुढारी

भोर : शेतकर्‍यांचा पीक कर्जाचा परतावा लवकरच देऊ: आमदार संग्राम थोपटे यांचे प्रतिपादन

भोर; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने कायमच शेतकर्‍यांना प्राधान्य दिले आहे. 105 वर्षांच्या कालखंडात बँकेने ग्राहक, खातेदार, शेतकरी यांचा विश्वास जिंकला. त्यामुळे सहकार क्षेत्रातील अग्रेसर म्हणून या बँकेची ओळख आहे. पीक कर्जाचा व्याज परतावा शेतकर्‍यांना लवकरच देणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

भोर शाखा क्रमांक 2 मध्ये बँकेचा 105 वा वर्धापदिन साजरा करण्यात आला. या वेळी आ. थोपटे बोलत होते. बँकेचे विभागीय अधिकारी एस. व्ही. पवार, वसुली अधिकारी विनोद काकडे, शाखाधिकारी बाळासाहेब चव्हाण, सत्यवान आवाळे, एस. के. खोपडे, राजेंद्र हुंबरे, एल. एस. गिरे, सचिन जेधे आदींसह तेदार बहुसंख्येने उपस्थित होते.

रविवारची सुटी असतानाही बँकेच्या कर्मचार्‍यांनी तालुक्यातील 11 शाखांमध्ये हजर राहून खातेदारांच्या उपस्थितीत वर्धापन दिन साजरा केला. या वेळी खातेदारांचा सन्मान करण्यात आला. बँकेला सुटी असली तरी शेतकर्‍यांच्या 50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी बँक सुरू ठेवण्यात आली होती, असे विभागीय अधिकारी सुदाम पवार यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

Back to top button