माझी आणि अशोक चव्हाणांची भेट नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण | पुढारी

माझी आणि अशोक चव्हाणांची भेट नाही; फडणवीसांचे स्पष्टीकरण

पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. यामुळे आता कोणते राजकीय स्थित्यंतर होणार या चर्चेला उधाण आले होते. यावर उपमुख्यमत्र्यांनी मौन सोडत, माझी आणि अशोक चव्हाणांची कोणत्याही प्रकारे भेट झालेली नाही. एका ठिकाणी दर्शनासाठी गेले असता, आम्ही एकमेकांसमोर आलो असल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पुणे स्टेशन डेपोच्या उद्धाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

ई बस डेपो उद्घाटन व 90 इलेक्ट्रीक बसेसचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे आज पार पडला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, पुणे शहर पूर्णपणे अपारंपारिक उर्जा स्त्रोतांवर चालवले जावे असा आमचा मानस आहे. सध्या तरी पुणे शहराला अपारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून ऊर्जा पुरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पुणे स्टेशन डेपोच्या उद्धाटनप्रसंगी त्यांनी या कामासाठी पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे मानले आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button