पिंपळे गुरव परिसरात कचर्‍याचे साम्राज्य  | पुढारी

पिंपळे गुरव परिसरात कचर्‍याचे साम्राज्य 

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : परिसरातील भगतसिंग चौकाकडून सुदर्शन चौकाकडे जाणार्‍या पदपथावर जागोजागी कचर्‍याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गणेशोत्सवानिमित्त घरोघरी साफसफाई करण्यात आली होती. परंतु, अनेक नागरिकांनी घरातील कचरा पदपथावरच फेकला आहे. परिसरात घंटागाडी दररोज येते. तरीही रस्त्यावरच कचरा टाकणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सध्या साथीचे आजारांनी डोके वर काढले आहे. त्यातच नागरिकांकडून स्वच्छतेला हरताळ फासला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेकडून नागरिकांना घंटागाडीतच कचरा टाकण्याचे आवाहन केले जाते. परंतु, याकडे नागरिक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

Back to top button