कळंबला जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव | पुढारी

कळंबला जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव

मंचर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या परिसरातील दहा किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व भोरवाडी येथील बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार मौजे कळंब (ता. आंबेगाव) येथील जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी घोषित करण्यात आले आहे. तसेच या गावापासून 10 किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये बाधित व निगराणी क्षेत्रामधील मोठ्या जनावरांची खरेदी-विक्री वाहतूक, बाजार जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.

त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग व भोरवाडी येथे उद्या होणार्‍या बैलगाडा शर्यती पुढे ढकलण्यात आले आहेत. तहसीलदार रमा जोशी यांनी तसे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शर्यतीच्या नवीन तारखा जाहीर करणार आहोत, अशी माहिती संयोजकांनी

Back to top button