पुणे : एसबीआयची तिघांकडून 34 लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : एसबीआयची तिघांकडून 34 लाखांची फसवणूक

पुणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल 32 लाख 80 हजारांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र चिमणराम फुलडालिया (रा. गणेशनगर, वडगाव शेरी), कैलासचंद रामेश्वर लाल (रा. मांजरी बुद्रुक) याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीत रंजन (वय 46, रा. वारजे माळवाडी) यांनी डेक्कन पोलिसांत फिर्याद दिली आहे. 29 डिसेंबर 2018 रोजी हे कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आली.

Back to top button