पुणे जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त | पुढारी

पुणे जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त

पुणे : गाव तलाठी हा महसूल विभागाचा महत्त्वाचा घटक असून, शेतजमिनीच्या नोंदी ठेवण्यापासून ते शेती नुकसानीची नोंद घेण्याचे महत्त्वाचे काम असते, परंतु जिल्ह्यात तलाठ्यांची 75 पदे रिक्त आहेत. एक उपजिल्हाधिकारी, दोन तहसीलदार, 15 नायब तहसीलदारांची पदेही रिक्त असल्याने त्याचा थेट कामकाजावर परिणाम होत आहे.

तहसील, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांत असलेल्या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. त्यातच जिल्हा पुरवठा आणि अन्न धान्य वितरण कर्मचार्‍यांना मूळ पदांवर पाठविण्यात आले आहे.

Back to top button