कामशेत-खांडशी रस्त्याची पावसामुळे चाळण | पुढारी

कामशेत-खांडशी रस्त्याची पावसामुळे चाळण

कामशेत : नाणे मावळातील कामशेत ते खांडशीकडे जाणार्‍या रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. जवळपास पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन दुधवाले, विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यावसायिकांची दररोज वर्दळ असते.

या रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पूल पावसामुळे दोन वेळा पाण्याखाली होता. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. शिवाय याठिकाणी मोठे खड्डेदेखील पडलेले आहेत व पुलाचे कठडाही तुटलेला आहे. हा रस्ता नुकताच पावसाळ्यापूर्वी तयार करण्यात आला होता. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी
केली आहे.

Back to top button