आंतरजिल्हा बदलीने 98 शिक्षक पुण्यात; पुढील आठवड्यात होणार रुजू | पुढारी

आंतरजिल्हा बदलीने 98 शिक्षक पुण्यात; पुढील आठवड्यात होणार रुजू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य शासनाने ऑनलाइन पद्धतीने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यात पुणे जिल्ह्यातील 55 शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर 98 शिक्षक पुण्यात बदलून आले आहेत. पुण्यात आलेले शिक्षक पुढील आठवड्यात रुजू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. दोन वर्षांनंतर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आंतरजिल्हा बदल्या 21 ऑगस्ट रोजी झाल्या.

बदलीसाठी ऑनलाउन अर्ज करीत असताना चुकीची माहिती भरल्याने अर्ज बाद झालेल्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी थांबविण्यात येणार असल्याने पुणे जिल्ह्यात एकही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांमधून कार्यमुक्त करण्यात आले आहे; तसेच जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांना सोमवारपर्यंत आदेशात दिलेल्या ठिकाणी रुजू होण्यास सांगितल्याची माहिती आयुष यांनी दिली.

Back to top button