कोरमअभावी बेल्हे ग्रामसभा तहकूब | पुढारी

कोरमअभावी बेल्हे ग्रामसभा तहकूब

बेल्हे : कोरमअभावी बुधवारी (दि.24) आयोजित विशेष ग्रामसभा बेल्हे ग्रामपंचायत प्रशासनाला तहकूब करावी लागली. बेल्हे ग्रामपंचायत सभागृहात सरपंच गोरक्षनाथ वाघ यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच नीलेश कणसे, तंटामुक्त ग्रामसमितीचे माजी अध्यक्ष टी. एल. गुंजाळ, प्रदीप पिंगट आदींच्या उपस्थितीत या विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी ग्रामस्थांना ग्रामसभेला उपस्थित असल्याच्या सह्या करण्यास सांगितले होते. पुरेशा कोरमनंतरच सभा सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, ग्रामसभेला 50 ग्रामस्थ उपस्थित असल्याने, ग्रामसभेचा कोरम पूरा होत नसल्याने, ही ग्रामसभा तहकूब करण्याचा निर्णय सरपंच गोरक्षनाथ वाघ यांनी घेतला.

Back to top button