शिंदेगावातून अडीच लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

शिंदेगावातून अडीच लाखांचा गुटखा जप्त

चाकण : चाकण औद्योगिक परिसरातील शिंदेगाव येथून एका खोलीतून पोलिसांनी 2 लाख 43 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी ओमजी बिष्णोई, (वय 32, रा. खालुंब्रे, ता. खेड), अजित पानमंद, (रा. शिंदेगाव, ता. खेड) या दोघांविरोधात महाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदेगावातील अजित पानमंद यांच्या खोलीत बुधवारी (दि. 17) पोलिसांना पोत्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा व तंबाखुची साठवणूक केल्याचे आढळून आले. हा एकूण 2 लाख 43 हजार 343 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोघा आरोपींनी हा माल विक्रीसाठी साठवून ठेवला होता. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button