‘स्वीट कॉर्न’ला 16 रुपये भाव | पुढारी

‘स्वीट कॉर्न’ला 16 रुपये भाव

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : ‘स्वीट कॉर्न’ कणसांना 14 ते 16 रुपये किलोला बाजारभाव मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या याची मकाकाढणी जोरात सुरू आहे. या भागात गेल्या काही वर्षांत शेतकरी मक्याच्या पिकाकडे वळाले आहेत. मक्याच्या कणसांना बाजारभाव सातत्याने चांगला मिळत आहे. सध्या पावसाळ्यात कणसांना चांगला बाजारभाव मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी किलोला 22 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत होता.

बाजारपेठांमध्ये मक्याच्या कणसांची आवक वाढल्याने बाजारभावात थोडी घसरण झाली आहे. मका पिकाचा दुहेरी फायदा शेतकर्‍यांना मिळतो. कणसे खुडल्यानंतर उरलेली मक्याची ताटे जनावरांसाठी चारा म्हणून उपयोगी पडतात. मका पिकाला भांडवल कमी लागते. बाजारभावातून शिल्लक नफा चांगला राहत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या पावसाळ्यात पर्यटन केंद्रांवर मोठी गर्दी आहे. पर्यटकांकडून मका कणसांना मोठी मागणी असते. मुंबई, पुणे या मोठ्या बाजारपेठांमध्ये सध्या मका कणसांची आवक वाढली आहे.

Back to top button