पुणे शहरप्रमुखांसह शिवसेनेच्या सहा पदाधिकार्‍यांना जामीन | पुढारी

पुणे शहरप्रमुखांसह शिवसेनेच्या सहा पदाधिकार्‍यांना जामीन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या शिवसेनेच्या सहा पदाधिकार्‍यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. पुणे शहरप्रमुख संजय मोरे (वय 43), शहर समन्वयक अ‍ॅड. संभाजी थोरवे (वय 55), कसबा विभागप्रमुख चंदन साळुंके (वय 49), युवासेना विस्तारक राजेश पळसकर (वय 38), पर्वती विभागप्रमुख सूरज लोखंडे (वय 34), हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात (वय 50) अशी जामीन अर्ज मंजूर करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर 2 ऑगस्ट 2022 रोजी कात्रज चौकात हल्ला झाल्याप्रकरणी पोलिसांनी या सहा जणांना अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर या सहा जणांनी अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. अतुल पाटील यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

Back to top button