हिंजवडीत कॅब चालकाला लुटले | पुढारी

हिंजवडीत कॅब चालकाला लुटले

पिंपरी : हिंजवडी येथे दोन जणांनी मिळून ओला कॅब चालकाला मारहाण करून लुटले. ही घटना सोमवारी (दि. 8) पहाटे शिवाजी चौक, हिंजवडी येथे घडली. मयूर राजेंद्र ननवरे (22, रा. बोडकेवाडी-माण, ता. मुळशी, जि. पुणे) आणि प्रदीप राजेंद्र सावंत (24, रा. चंदननगर, खराडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रशेखर विठ्ठल हनवते (42, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 8) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रशेखर हे ओला कंपनीची कॅब चालवितात. दरम्यान, सोमवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास फिर्यादी चंद्रशेखर हे ओला कॅबमधून शिवाजी चौक हिंजवडी येथे दोन प्रवाशांना सोडण्यासाठी आले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करुन मोबाइल आणि ब्लूटूथ जबरदस्तीने चोरून नेला. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Back to top button