पिंपरी : राखीपौर्णिमेनिमित्त धावणार एसटीच्या ज्यादा गाड्या | पुढारी

पिंपरी : राखीपौर्णिमेनिमित्त धावणार एसटीच्या ज्यादा गाड्या

 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारामधून प्रवाशांच्या सोयीसाठी रक्षाबंधन अर्थात राखीपौर्णिमेनिमित्त गावी जाणार्‍या नागरिकांसाठी एसटीच्या ज्यादा गाड्या 6 ते 17 ऑगस्टपर्यंत सोडल्या जाणार आहेत. शहरात रोजगार आणि शिक्षणासाठी बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या महिन्यात मोहरम, रक्षाबंधन, पतेती आणि स्वातत्र्यदिन इत्यादी सणांमुळे सलग सुट्या आहेत.

या सुट्या गावी आपल्या आप्तेष्ठांमध्ये घालविण्यासाठी प्रवासी एसटी. ने गावी जाण्यास पसंती देतात. मात्र अशा वेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून आगारामधून कोल्हापूर, औरंगाबाद, दादर, बोरिवली व मुंबई या मार्गावरून धावणार्‍या सहा ज्यादा गाड्या सुरू केल्या आहेत. यासाठी आरक्षणाची सोय केली असून, यासेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुखांनी केले आहे.

या महिन्यात विविध सणांमुळे सलग सुट्या चालून आल्या आहेत. परिणामी प्रवाशांची संख्या अधिक असते. अशा वेळी आगारातून धावणार्‍या गाड्या अपुर पडल्याने प्रवाशांचे हाल होऊ नये, म्हणून प्रवाशांच्या सोईसाठी आम्ही ज्यादा गाड्या सोडल्या आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
– स्वाती बांद्रे, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर.

Back to top button