पुणे : गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद | पुढारी

पुणे : गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विद्युत, पंपिंगविषयक व स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी (4 ऑगस्ट) शहरातील बहुतांश भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे : पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपिंग) – शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रोड ते एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे नं 42,46 ( कोंढवा खुर्द) इत्यादी परिसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.

लष्कर जलकेंद्र भाग : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी इत्यादी परिसर.

Back to top button