भोरमध्ये महाविकास आघाडी की वेगळे लढणार | पुढारी

भोरमध्ये महाविकास आघाडी की वेगळे लढणार

भोर; पुढारी वृत्तसेवा: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवाराचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता भोरमध्ये महाविकास आघाडी राहणार, की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष वेगळे लढणार, हा चर्चेचा विषय आहे. भोर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी मागील पंचवार्षिकला तीन गट होते. यावेळी एक नव्याने तयार झाला आहे. वेळू – नसरापूर गट हा ओबीसीसाठी आरक्षित आहे. शिवसेनेतून ज्ञानेश्वर शिंदे , अमोल पांगारे, बाळासाहेब जायगुडे, तर काँग्रेसकडून माऊली पांगारे, माजी पंचायत समिती सभापती लहूनाना शेलार, राष्ट्रवादीकडून गणेश खुटवड, भाजपाकडून तालुका अध्यक्ष जीवन कोंडे, विश्वास ननावरे हे इच्छुक असल्याचे चित्र आहे. मागील पंचवार्षिकला हा गट शिवसेनेच्या शलाका कोंडे यांच्याकडे होता. त्यामुळे हा गट शिवसेनेला महाविकास आघाडीतील नेते मंडळी सोडतील का ? हा कळीचा प्रश्न आहे.

संगमनेर- नव्याने तयार झालेला संगमनेर-भोंगवली गटात सर्वसाधारण खुला असल्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असून राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये आधी उमेदवारासाठी खरी लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम खुटवड , माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे , जिल्हा बँकेचे माजी संचालक भालचंद्र जगताप, काँग्रेसकडून लहुनाना शेलार, शिवसेनेकडून कुलदीप कोंडे, भाजपाकडून विलास बांदल, वैभव धाडवे, मानसिंग मालुसरे हे इच्छुक आहेत. या गटात राष्ट्रवादी पक्षाची ताकद मोठी असली तरी उमेदवार एकत्र येऊन लढतील का ? हा प्रश्न आहे.

भोलावडे – शिंदे हा गट – सर्वसाधारण असल्यामुळे या गटात मागील पंचवार्षिकला काँग्रेसचे विठ्ठल आवाळे हे सदस्य होते, ते विद्यमान सदस्य म्हणून उभे राहू शकतात, तर बाजार समितीचे सभापती अकुंश खंडाळे, तर राष्ट्रवादीकडून माजी पंचायत समितीचे उपसभापती मानसिंग धुमाळ, रवींद्र बांदल, बी. डी. गायकवाड, लक्ष्मण दिघे, शिवसेनेतून राजाराम माने, भरत साळुंखे, दीपक बर्डे, तर भाजपकडून शिवाजी देशमुख, अमोल पिलाणे, महाविकास आघाडीच्या नियमानुसार हा गट काँग्रेसला पक्षाचे पदाधिकारी सोडतील का, याची उत्सुकता राहणार आहे.

उत्रौली – कारी गट हा सर्वसाधारण असून, काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, परंतु मागील पंचवार्षिकला राष्ट्रवादीकडून रणजित शिवतरे हे सदस्य म्हणून निवडून येऊन पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले होते, तर राष्ट्रवादीकडून रणजित शिवतरे, संतोष घोरपडे, रामदास जेधे, राजेश गिरे, काँग्रेसकडून आनंदराव आंबवले, अनिल सावले, प्रमोद थोपटे, रवी थोपटे, पांडुरंग धोंडे, सूर्यकांत किंद्रे, शिवसेनेकडून लक्ष्मण मोरे, शिवाजी बांदल, लक्ष्मण म्हस्के, गोंविद सावले ,भाजपाकडून अमर बुदगुडे, नितीन भागवत हे नव्याने तरुण उमेदवार इच्छुक असल्याची चर्चा सुरू आहे.

Back to top button