रेल्वे उड्डाणपुलाखाली दोन जिन्यांची दुरवस्था; कोरेगाव पार्क येथील समस्या | पुढारी

रेल्वे उड्डाणपुलाखाली दोन जिन्यांची दुरवस्था; कोरेगाव पार्क येथील समस्या

कोरेगाव पार्क; पुढारी वृत्तसेवा: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाखाली असलेले दोन्ही लोखंडी जिने जीर्ण झाले आहेत. जिन्यांच्या लोखंडी पायर्‍या खिळखिळ्या झाल्या आहेत, त्यामुळे हे जिने धोकादायक झाले आहेत. परिसरातील संत गाडगे महाराज वसाहत, राजीव गांधी वसाहत, तसेच गल्ली नंबर एक ते सातमधील नागरिक उड्डाण पुलावर जाण्यासाठी या जिन्याचा वापर करतात.
मागील अनेक वर्षांपासून या जिन्यांचा वापर होत असल्याने ते सध्या जीर्ण झाले आहेत. महापालिका प्रशासनाने या ठिकाणी नवीन जिने उभे करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

घोरपडीतील नागरिकांमधून नाराजी
कोरेगावपार्क-घोरपडी परिसरात (प्रभाग 21) मागील पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आलेला आहे. मात्र, अनेक विकासकामे मार्गी लागली नाहीत. येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाण पुलाचे जीर्ण झालेले जिने बदलण्याची तसदीसुद्धा महापालिका प्रशासनाने घेतली नाही, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Back to top button