पिंपरी : पीएमपीचा बायोसीएनजी प्रयोग ढगात | पुढारी

पिंपरी : पीएमपीचा बायोसीएनजी प्रयोग ढगात

राहुल हातोले : पिंपरी : कचर्‍यापासून निर्माण होणार्‍या बायो सीएनजीवर धावणार्‍या पीएमपी बस पंपावर प्रेशर मिळत नसल्याने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्वीडननंतर पुण्यात हा प्रयोग करण्याचा गाजावाजा फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

डिझेलचे वाढते दर आणि पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक इंधनाची गरज लक्षात घेऊन पीएमपीने सीएनजी गॅसचा वापर वाढविला आहे. त्यापुढे जाऊन ओल्या कचर्‍यापासून तयार होणार्‍या बायो सीएनचा प्रयोग पंधरा दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आला होता.

अशा प्रकारच्या गॅसचा वापर करणारे जगातील दुसरे शहर म्हणून पुणे-पिंपरी-चिंचवड असल्याचा गवगवाही करण्यात आला. मात्र, सोमाटणे फाटा येथील पंपावर प्रेशर मिळत नसल्याने गोंधळ निर्माण होऊन हा प्रयोग बंद पडला आहे.

Back to top button