पुरंदर पश्चिम भागातील पेरण्या रखडल्या | पुढारी

पुरंदर पश्चिम भागातील पेरण्या रखडल्या

सासवड, पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील गराडे, चांबळी, नारायणपूर, चिव्हेवाडी, केतकावळे या परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अद्यापही अधूनमधून पडणार्‍या पावसामुळे वाफसा मिळत नसल्याने तालुक्याच्या अनेक भागांत पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या 34.19 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. पुरंदर तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी सासवड येथे कृषी मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक आदी शासकीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीत तालुक्यातील कृषी समस्यांबाबत उपाय योजना करण्यासंबंधी चर्चा झाली.

तालुक्यात एकूण अन्नधान्याचे खरिपातील क्षेत्र 19,219.35 हेक्टर असून, आतापर्यंत 34.19 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. चारा पिकांचे खरिपातील क्षेत्र 1124.60 हेक्टर, मसाला पिके 36 हेक्टर, फूलशेती 329.80 हेक्टर असून, येथेही कमी-अधिक अशीच स्थिती आहे. दरम्यान, लागणीच्या लहान पिकांना दीड आठवड्यापासून सतत पडणार्‍या पावसाने मार दिल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले तालुक्याच्या जवळपास 60 ते 65 टक्के क्षेत्रात वाफसा मिळेल, या आशेने थोडया उशिराने का होईना, पेरणी होईल. जूनमध्ये सरासरीच्या 60 व जुलैमध्ये सरासरीच्या 80 टक्के पाऊस झाला. खरीप पेरणीस विलंब झाल्याने मूग, उडदाचे क्षेत्र कमी होण्याचे संकेत आहेत. सोयाबीन, कांदा, ऊस क्षेत्र यंदा वाढेल, असा अंदाज आहे, असे तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी सांगितले.

तालुक्यातील सरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र (टक्केवारी)
1) भात रोपवाटिका- सरासरी क्षेत्र- 120.82 हेक्टर, पेरा -59.18 टक्के
2) भात सरासरी क्षेत्र -1208 हेक्टर पेरा- 4.23 टक्के
3) मका सरासरी क्षेत्र 465.16 हेक्टर, पेरा-13.92 टक्के
4) बाजरी सरासरी क्षेत्र-12327.20 हेक्टर, पेरा – 32.47 टक्के

एकुण तृणधान्य सरासरी क्षेत्र – 14000.51 हेक्टर, पेरा- 29.42 टक्के
1) मूग सरासरी क्षेत्र – 327 हेक्टर, पेरा – 32.44 टक्के,
2) तूर सरासरी क्षेत्र – 222.17 हेक्टर,पेरा 26. 78 टक्के
3) उडीद सरासरी क्षेत्र – 161.29 हेक्टर, पेरा16.00 टक्के
4) वाटाणा, घेवडा सरासरी क्षेत्र – 2121.86 हेक्टर, पेरा 37.41 टक्के

एकूण कडधान्य सरासरी क्षेत्र -2832.36 हेक्टर, पेरा34.78 टक्के
1) भुईमूग सरासरी क्षेत्र 2049.80 हेक्टर पेरा 27.93 टक्के
2) सूर्यफूल 10 हेक्टर 00 टक्के पेरा,
3)सोयाबीन 311.02 हेक्टर 42.25 टक्के पेरा,
4) कारळ 13.06 हेक्टरी 98. 39

एकूण गळीतधान्य 2386.48 हेक्टर 30.4
एकूण पीक पेरणी उसाशिवाय 19219,35 हेक्टर 50.22 टक्के पेरा,
एकूण लागवड उसासहित 21675.35 हेक्टर 48.64 टक्के पेरा
कांदा 523.20 हेक्टर, टोमॅटो 700.20 हेक्टर, पालेभाज्या 535.60 हेक्टर, एकुण भाजीपाला 3218.70 हेक्टर

Back to top button