पुणे : खंडणीखोर परदेशी टोळीवर मोक्का | पुढारी

पुणे : खंडणीखोर परदेशी टोळीवर मोक्का

पुणे : व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याप्रकरणी श्रीनाथ परदेशी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली. या टोळीने संबंधित व्यावसायिकाकडून 2012 पासून प्रतिमहा सात हजार, तर 2016 पासून 10 हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतले आहेत. श्रीनाथ उर्फ शेरूपरदेशी रणजित परदेशी, चिराग जोशी, अथर्व देशपांडे (सर्व रा. शिवाजीनगर गावठाण) आणि प्रवीण शेळके (रा. मॉडर्न कॉलनी, शिवाजीनगर), अशी ही कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

या टोळीवर खून, बलात्कार, अपहण, खंडणी आणि दहशत पसरविणे आदी प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, गुन्हे निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ आहिवळे, अंमलदार राहुल होळकर, दिलीप नागरे, तुकाराम म्हस्के यांनी याबाबतचा अहवाल तयार करून अपर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे सादर केला होता.

Back to top button