पुणे : साडेपाचशे शिक्षक बदली प्रक्रियेत; जिल्हा परिषदेच्या शाळेतच राहणार कार्यरत | पुढारी

पुणे : साडेपाचशे शिक्षक बदली प्रक्रियेत; जिल्हा परिषदेच्या शाळेतच राहणार कार्यरत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: समाविष्ट गावांमधील शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात अशा 571 शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. या शिक्षकांचा ऑनलाईन बदली प्रक्रियेत समावेश केला जाणार आहे. त्यानुसार महापालिका, नगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

महापालिका व नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येच हे कर्मचारी कार्यरत असतील. या शिक्षकांना राज्य सरकारच्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयानुसार आता ऑफलाईन समुपदेशनाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना राज्यस्तरीय ऑनलाईन शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले आहे. दरम्यान, ज्या शिक्षकांना एकाच ठिकाणी 10 वर्षे पूर्ण झाली आहेत, असे शिक्षक बदलीस पात्र ठरत आहेत, असे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.

समाविष्ट गावांतील शिक्षकांची संख्या 413
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 35 गावांमधील एकूण 66 शाळांमध्ये सध्या 413 शिक्षक आहेत, तर बारामती तालुक्यातील 4 गावांमधील 9 शाळांमध्ये 57 शिक्षक आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या मुळशी तालुक्यातील 96 शिक्षकांचे समायोजन होणार आहे. तसेच ऊर्दू माध्यमातील 5 शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व शिक्षकांचा बदली प्रक्रियेत समावेश करून जिल्ह्यातील इतर शाळांमध्ये बदली होणार आहे.

 

Back to top button