पुणे : द्रौपदी मुर्मू यांना विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाची पत्रे | पुढारी

पुणे : द्रौपदी मुर्मू यांना विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाची पत्रे

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने पहिल्यांदाच आदिवासी व्यक्ती राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानिमित्त पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी पेढे वाटून, ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर करून आणि पत्र लिहून मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रपती झाल्यानिमित्त अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांनी द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देताना व त्यांचे अभिनंदन करतानाच पत्राद्वारे त्यांच्याकडे भेटीची इच्छादेखील व्यक्त केली. मुर्मू या आदर्श व्यक्ती असून, त्या आमच्या प्रेरणास्त्रोत आहेत. देशाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची व अभिमानाची घटना आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही देशाची व समाजाची सेवा करायची आहे, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. संस्थेचे अध्यक्ष दीपक पायगुडे, शिक्षण संचालक नरहरी पाटील, शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, पी. शोफीमोन आदी उपस्थित होते.

Back to top button