पुणे : दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत बसचालकावर गुन्हा | पुढारी

पुणे : दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत बसचालकावर गुन्हा

कुरकुंभ, पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीत कंपनीची बस व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला होता. अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला होता. बुधवारी (दि.20) या प्रकरणी बसचालकावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गोकुळ नारायण जगदाळे (रा. वेताळनगर, ता. दौंड) असे बसचालकाचे नाव आहे. दिलीप तेजा चव्हाण (वय 50, रा वाई तांडा, ता. हिमायतनगर, जि. नांदेड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि.19) दुपारी कुरकुंभ एमआयडीसीतील इटर्निस कंपनीसमोरील रस्त्यावर अल्काईल आमाईन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणार्‍या (एमएच 42 एफ 4032) बसची व दुचाकीचा अपघात झाला.

या घटनेत अविनाश अशोक चव्हाण (वय 25, सध्या रा. झगडेवाडी, ता. दौंड, मूळ रा. नांदेड हा दुचाकीस्वार ठार झाला होता. घटनेनंतर बसचालक फरार झाला होता. तपास पोलिस हवालदार शंकर वाघमारे करीत आहे.

Back to top button