पिंपरी : टेम्पोतील माल चोरीला, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : टेम्पोतील माल चोरीला, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : टेम्पोतील साडेतीन लाखांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 18) पहाटे कृष्णानगर, चिंचवड येथे घडली. विजय अरविंद पराडे (43, रा. रुपीनगर, तळवडे. मूळ रा. माळशिरस, सोलापूर) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे टेम्पोचालक असून त्यांच्या टेम्पोत मोशी येथील डीमार्टला पोहचवण्यासाठी माल भरला होता. त्यानंतर फिर्यादी यांनी माल असलेला टेम्पो स्पाईन रोडवरील अश्विनी हॉस्पिटलच्या शेजारी टेम्पो पार्क केला. दरम्यान, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञातांनी टेम्पोचे लॉक तोडून आतील तीन लाख 47 हजार 23 रुपयांचे खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्या.

Back to top button