पुणे : सिंहगड रस्त्यावर माणिकबागेत सिलिंडर गळतीने आग | पुढारी

पुणे : सिंहगड रस्त्यावर माणिकबागेत सिलिंडर गळतीने आग

सिंहगड रोड / पुणे, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी सकाळी श्री गजानन शेगाव कचोरी या माणिकबागेतील दुकानात सिलेंडर गळतीमुळे आग लागली आणि आगीने काही क्षणात बाहेर असणाऱ्या लाकडी फर्निचरला आपल्या विळख्यात घेतले. त्यामुळे आग आणखीनच भडकली. आगीच्या गरमीमुळे गळती होत असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला, या आगीत आसपासच्या दुकानांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आमदार, खासदार गेले तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही, संजय राऊतांचा दावा

सकाळी पावणे ९ च्या सुमारास प्रत्यक्षदर्शीनी अग्निशामक दलाला आगीची कल्पना दिली. १० मिनिटात अग्निशामक दल घटनास्थळी पोचले व त्यांनी आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या कारवाईमध्ये सिंहगड अग्निशामक दलाचे तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाखले, संजू चव्हाण, संदीप पवार, जरे यांनी आग विजवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

तीन आठवड्यापूर्वी श्री गजानन शेगाव कचोरीची फ्रांचायझी घेतली होती. लाकडी फर्निचर यासाठी देखील खर्च केला होता. मात्र, आजच्या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

                                                                                        – सुमित राऊत, मालक

आगीवर नियंत्रण मिळविताना अग्नी शामक दलाचे जवानया आगीमध्ये साई प्रेमाचा चहा, श्री गजानन शेगाव कचोरी व द बेल्जियम वॉफल या दुकानांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या पैकी द बेल्जियम वॉफल दुकानातील एसी, फ्रीज आदी गोष्टींचे आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आगीत जळून खाक झालेल्या दुकानाची अवस्था

Back to top button