पिंपरी : किरकोळ कारणाने एकास मारहाण | पुढारी

पिंपरी : किरकोळ कारणाने एकास मारहाण

पिंपरी : दारूसाठी पैसे मागितले म्हणून एकाने मारहाण करीत, लोखंडी पाइप डोक्यात मारून, गंभीर जखमी केले आहे. ही घटना शुक्रवारी (15 रोजी) साडेसात वाजता चिंचवड येथील वेताळनगरमध्ये घडली आहे.

महिला फिर्यादी यांचा पती रोहित चव्हाण (वय 28) याने आरोपी अरबाज इस्माईल शेख (वय 23 रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड) यांस दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

या कारणावरून चिडून आरोपीनेे फिर्यादी यांच्या पतीला लोखंडी पाईपने मारहाण करीत, गंभीर जखमी केले आहे, अशी फिर्याद महिलेने शनिवारी चिंचवड पोलिस ठाण्यात दिली आहे.

Back to top button