पुणे :मद्यपी चालकाने बस धडकविली सिग्नलला | पुढारी

पुणे :मद्यपी चालकाने बस धडकविली सिग्नलला

पुणे : मद्यपी चालकाने पीएमपी बस वारजे पुलाखालील सिग्नलला धडकविली. या अपघातात बसची पुढील काच फुटून नुकसान झाले आहे. ही घटना वारजे पुलाखाली बुधवारी रात्री 11 वाजता घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी पीएमपी बसचालक अनिल नामदेव केंजळे (वय 50, रा. आनंद पार्क सोसायटी, वडगाव शेरी) याला अटक केली आहे. याबाबत पोलिस शिपाई किशोर नेवसे यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल केंजळे हे नशेमध्ये पीएमपी बस घेऊन चालले होते. त्यांनी नशेत वारजे पुलाखालील सिग्नलच्या खांबाला धडकून दुभाजकाला धडक दिली. त्यात सिग्नलचे नुकसान झाले. बसची पुढील काच फुटली. वारजे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक होळकर यांनी चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. त्यात केंजळे नशेच्या अंमलाखाली असल्याचे दिसून आले.

Back to top button