शॉक लागून दोन गायींचा मृत्यू | पुढारी

शॉक लागून दोन गायींचा मृत्यू

येळसे : परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (दि.13) सायकळी 5 च्या सुमारास बेडसे येथील तिखेवस्ती येथे विजेच्या विद्युत वाहक तारांवर झाड पडल्यामुळे संजय शिर्के यांच्या दोन गायींना विजेचा शॉक लागून दोन गायीचा जागीच मृत्यु झाला.

यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी शिर्के यांनी महावितरणकडे केली आहे.

Back to top button