पिंपरी : शहरात कोरोनाचे 238 बाधित रुग्ण | पुढारी

पिंपरी : शहरात कोरोनाचे 238 बाधित रुग्ण

पिंपरी : शहरात बुधवारी (दि. 13) दिवसभरात 238 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 284 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 53 रुग्णांवर उपचार केले जात आहे. तर, 1 हजार 297 सक्रिय बाधित रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे.

आज दिवसभरात 684 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. शहरात आज अखेर एकूण 3 लाख 64 हजार 683 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 3 लाख 59 हजार 439 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आत्तापर्यंत एकूण 4 हजार 625 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Back to top button