विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: नीट परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड मिळणार आजपासून | पुढारी

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी: नीट परीक्षेचे अ‍ॅडमिट कार्ड मिळणार आजपासून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वैद्यकीय प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावरून घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेची (नीट) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मंगळवारपासून (दि.12 जुलै) उपलब्ध होणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या https://neet.nta.nic.in/ या वेबसाइटद्वारे ही उपलब्ध असतील. येत्या 17 जुलैला देशातील 497 शहरांमध्ये ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 या वेळेत पार पडणार आहे.

‘विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक सबमिट करून प्रवेशपत्र उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास 011-40759000 या क्रमांकावर किंवा neet@nta.ac.in. या इमेल आयडीवर संपर्क साधता येणार आहे, असे, एनटीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Back to top button