पिंपरी : घरगुती भांडणातून पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न  | पुढारी

पिंपरी : घरगुती भांडणातून पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न 

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरगुती भांडणातून पतीच्या पतीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पत्नीसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडला.

उमाकांत विलास तपसाळे (४१, रा. आळंदी रोड, भोसरी) यांनी गुरुवारी (दि. ७) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांची पत्नी स्वाती उमाकांत तपसाळे (वय २९), अभिराम गायकवाड (रा. बावडा चौक, इंदापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी पत्नी यांच्यात वाद होत असल्याने ते एकत्र राहत नाहीत. दरम्यान २५ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी एमआयडीसीतील फुलेनगर येथून पायी जात होते. त्यावेळी आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांच्या डोक्यात बियरची बाटली फोडली.

तसेच, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्या अंगावर डिझेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी २६ जून रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, पोलिस तपासात घटनास्थळ एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या हद्दीत असून आरोपींनी फिर्यादी यांच्या अंगावर डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. त्यामुळे कलम वाढ करीत गुन्हा एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साकोरे करीत आहेत.

Back to top button