सर्वसामान्यांना परवडणारी एसटीची पार्सल सुविधा बंद | पुढारी

सर्वसामान्यांना परवडणारी एसटीची पार्सल सुविधा बंद

पुणे : सर्वसामान्यांना परवडणारी एसटीची पार्सल सुविधा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. ही सुविधा बंद असल्याने इतर जिल्ह्यांत पार्सल पोहोचविण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला सुरुवात झाली आणि एसटीची पार्सल सुविधाच बंद झाली. त्यानंतर, संपाच्या काळात पार्सल तर सोडाच, पण नागरिकांना प्रवास करण्यासाठी गाड्याच उपलब्ध होत नव्हत्या. याचाच फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी लूट केली.

एसटी संपापासून एसटीची पार्सल सेवा बंद आहे. राज्यभरात एसटी मार्फत पार्सल सुविधा सुरू होती. ती सध्या बंदच असून, पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे, याकरिता मुंबई येथील मुख्यालयात एजन्सी नेमण्याचे काम सुरू आहे.

                    – ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी, पुणे विभाग

 

Back to top button