आपत्ती व्यवस्थापनची महाड येथे बैठक | पुढारी

आपत्ती व्यवस्थापनची महाड येथे बैठक

भोर : पुढारी वृत्तसेवा: महाड आणि पोलादपूर तालुका व शेजारील रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्हे यांच्यात आपापसांत आपत्ती व्यवस्थापन समन्वय साधण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात आंतर जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, आमदार भरत गोगावले व आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, भोरचे तहसीलदार सचिन पाटील ,उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे, तहसीलदार सुरेश काशीद व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

या समन्वय बैठकीच्या सुरुवातीस उपस्थित सर्व शासकीय विभागांकडून आपत्ती निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी घेतली. वीज मंडळासह अन्य शासकीय विभागातील कर्मचार्‍यांनी आपत्ती काळात केवळ आपल्या विभागाच्या कामापुरते मर्यादित न राहता आवश्यकता भासेल अशी सर्व प्रकारची कामे करण्याची तयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.

 

 

Back to top button