पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार | पुढारी

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 16 फेब्रुवारी ते 3 जुलै या कालावधीत भोसरी येथे घडला. रोहित तान्हाजी पाचारणे (20, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान, आरोपीने महिलेसोबत मैत्री करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button