पुणे : महाभूमी संकेतस्थळावरून पंचवीस लाख सातबारा डाउनलोड | पुढारी

पुणे : महाभूमी संकेतस्थळावरून पंचवीस लाख सातबारा डाउनलोड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या महसूल विभागाने अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या महाभूमी संकेतस्थळावरून पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी आतापर्यंत सर्वाधिक 25 लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि 6.38 लाख खाते उतारे डाउनलोड केले आहेत. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 2.21 कोटी डिजिटल सातबारा उतारे, तर 61.42 लाख डिजिटल खाते उतारे आणि 4.87 लाख डिजिटल स्वाक्षरीयुक्त फेरफार नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घेतले आहेत.

या माध्यमातून प्रतिउतारा 15 रुपयेप्रमाणे राज्य शासनाला 45 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.महसूल विभागाकडून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत सातबारा उतारा, फेरफार उतारा, आठ-अ खाते उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे.

राज्यभरातून डाउनलोड झालेले सातबारा
पुणे 25 लाख नऊ हजार 570, सोलापूर 14 लाख 77 हजार 360, नगर 14 लाख 12 हजार 124, सातारा 13 लाख 54 हजार 902, नाशिक 11 लाख 24 हजार 926, औरंगाबाद दहा लाख 58 हजार 288, नांदेड दहा 45 हजार 785, जळगाव दहा लाख 20 हजार 576, कोल्हापूर नऊ लाख 20 हजार 595, सांगली आठ लाख 55 हजार 690.

Back to top button