पिंपरीत भरदिवसा प्रॉपर्टी एजंटला लुटले | पुढारी

पिंपरीत भरदिवसा प्रॉपर्टी एजंटला लुटले

पिंपरी : पिंपरी येथे अशोक थिएटरजवळ एका प्रॉपटी एजंटला दुपारी पावणेदोन वाजता तीन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवित मोबाईल व रोख रक्कम, असा एकूण 26 हजार रूपये किंमतीचा ऐवज लुटला आहे. ही घटना शनिवारी (2 रोजी) दुपारी घडली.फिर्यादी सुरेंदर उर्फ दिनेश अर्जुनदास मेवानी (वय 42, रा. प्लॉट नं. 333, पिंपरी) हे प्रॉपर्टी एजंट असून, दुपारी आपल्या घराजवळ उभे असताना, तीन अज्ञात इसमांनी त्यांना शिवीगाळ केली.

यानंतर फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावून तीन हजार रूपये रोख व तेवीस हजार रूपयांचा मोबाईल असा एकुण 26 हजारांचा ऐवज पळवून नेला असून, त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली आहे. फिर्यादीने पिंपरी पोलिस ठाण्यात शनिवारी (2 रोजी) रात्री नऊ वाजता फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांविरोधात कलम 394, 506, 504,34, 37 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button