देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात प्लास्टिक बंदी | पुढारी

देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरात प्लास्टिक बंदी

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत दोन ते तीन वेळा प्लास्टिक बंदीची घोषणा केली होती. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही घोषणा केली आहे.

त्यामुळे याच्या अमंलबजावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्लास्टिक बंदीच्या जनजागृतीसाठी दुकानदारांना पत्रके देण्यात आली आहेत. या पत्रकावर कान साफ करण्याचे कापूस, आईस्क्रीमच्या कांड्या, फुग्यांच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, थर्माकोल, थर्माकोल प्लेट्स, विविध प्रकारच्या कॅरीबॅग व रॅपर्स, प्लास्टिकच्या निमंत्रण पत्रिका व फ्लेक्स बोर्ड वापरू नयेत, असे सांगण्यात आले आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांकडून दंड आकारण्यात येणार आहे. आता या नियमाची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या सूचनेची देहूरोड परिसरातील व्यापारी वर्ग किती अंमलबजावणी करतात, हे पाहणे गरजेचे आहे.

Back to top button