शिवाजीराव आढळराव पाटील शिवेसेनेतच! | पुढारी

शिवाजीराव आढळराव पाटील शिवेसेनेतच!

पुणे: पुढारी वृत्तसेवा: सकाळपासून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टी नाट्यावर आता पडदा पडला आहे. शिवाजीराव पाटील हे शिवसेनेतच कार्यरत असून त्यांच्या हाकालपट्टीचे दै.सामना मध्ये आलेले वृत्त अनावधानाने प्रसिद्ध झाले असल्याचे शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी पत्रक प्रसिद्ध साठी दिलेले आहे. आढळराव हे उपनेते पदी शिवसेनेतच कार्यरत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

शिवसेनेचे शिरूर मतदारसंघाचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी बद्दल वारंवार नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. पक्षप्रमुख आपल्याकडे लक्ष देत नाही, आपले ऐकत नाही, असे एका कार्यक्रमात बोलले होते. पक्ष विरोधी भूमिका घेतल्यामुळे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून काढून टाकल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेचे तीन वेळा निवडून आलेले खासदार होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हात शिवसेनेचे मोठा जाळे तयार झाले आहे. त्यांना पक्षातून काढून टाकले गेल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हि कारवाई प्रत्यक्षात असती तर, पुणे जिल्ह्यात शिवसेनेला आगामी काळात मोठा फटका बसला असता.

Back to top button