पिंपरी : मारुंजीत कारची चोरी | पुढारी

पिंपरी : मारुंजीत कारची चोरी

पिंपरी : पेट्रोल पंपासमोर पार्क केलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. मारुंजी येथे बुधवारी (दि. 29) सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सुदर्शन उमाशंकर चौरसीया (26, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 29) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार मारुंजी येथे पेट्रोलपंपासमोर लॉक करून पार्क केली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ती कार चोरून नेली.

Back to top button