पुणे : हडपसर येथे 52 लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

पुणे : हडपसर येथे 52 लाखांचा गुटखा जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हैद्राबाद कडून मुंबईकडे होणार्‍या गुटख्याची वाहतुक रोखण्यास अन्न औषध प्रशासनाला यश आले आहे. त्यांनी हडपसर पोलिसांच्या मदतीने तब्बल 52 लाख 18 हजारांचा गुटखा व एक 10 लाखाचा ट्रक असा 62 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

श्रीराम यादव (52) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याचे साथीदार सिदलेडत्त रेड्डी, विष्णु रेड्डी, सुशांत रे, दिपक कोठारी यांच्यावरही याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते (53) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Bachchu Kadu : इकडे सरकार कोसळलं अन् तिकडे बच्चू कडूंना क्लीन चिट, काय आहे नेमकं प्रकरण?

बुधवारी (29) दुपारी गुटख्याने भरलेला कंटनेर हैद्राबाद वरून मुंबई कडे निघाला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या कंटेनरला हडपसर येथील अतिथी हॉटेलच्या समोर हडपसर पोलिसांच्या मदतीने थांबविण्यात आले. यावेळी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये तब्बल 40 पोत्यात गुटखा आढळून आला. यावेळी एकाला अटक करण्यात आल्याचे गुन्हे निरीक्षक विश्वास डगळे यांनी सांगितले.

Back to top button