‘जेमकोव्हॅक-19’ लसीला परवानगी | पुढारी

‘जेमकोव्हॅक-19’ लसीला परवानगी

पुणे : ‘जेमकोव्हॅक 19’ या लसीला ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली आहे. भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर परवानगी मिळालेली ही तिसरी लस आहे. एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने कोरोनावर ही लस बनवली आहे.

अठ्ठावीस दिवसांच्या अंतराने इंट्रामस्क्युलर पद्धतीने ही लस दिली जाणार आहे. भारताबरोबरच जगभरातील कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लसीचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी 29 देश संपर्कात आहेत.

Back to top button