शिंदेवाडीजवळ बोगद्यात डोंगराचा भाग कोसळला | पुढारी

शिंदेवाडीजवळ बोगद्यात डोंगराचा भाग कोसळला

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा: कात्रज जुन्या बोगद्याच्या दक्षिण बाजूस शिंदेवाडीच्या हद्दीत डोंगरावरील काही भाग रस्त्यावर कोसळला. एक टेम्पो व दुचाकी बोगद्यात जात असताना हा भाग कोसळला; मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बुधवारी (दि. 22) दुपारी झालेला पाऊस तसेच गुरुवारी (दि. 23) दुपारी दोन वाजेनंतर झालेल्या पावसाने कात्रजच्या जुन्या बोगद्याच्या शेजारी दक्षिणेकडे असलेला डोंगराचा काही भाग कोसळला.

बोगद्याच्या शिंदेवाडी बाजूच्या प्रवेशद्वाराजवळच दरड कोसळली; मात्र यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. दरड रस्त्याच्या कडेला कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी रस्त्यावरील दगडी बाजूला काढून वाट मोकळी केली. यावरून दरडी कोसळण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दरडी कोसळू नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभागाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

हेही वाचा

खडकवासला धरणसाखळीवर पाऊस रुसला; गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के पाऊस

म्हैसाळ आत्महत्या प्रकरण : अंधश्रद्धेचे अजून किती बळी जाणार?

मंत्रिपदासाठी गुवाहाटीला जाणे ही गद्दारी! : जयेंद्र परूळेकर

Back to top button