पालखी सोहळ्यासाठी सासवड न. प. सज्ज | पुढारी

पालखी सोहळ्यासाठी सासवड न. प. सज्ज

नारायणपूर : पुढारी वृत्तसेवा: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथे शुक्रवारी (दि. 24) मुक्कामी येणार आहे. शुक्रवार आणि शनिवारी (दि. 25) मुक्काम करून हा सोहळा रविवारी (दि. 26) पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्याच्या काळात नगरपालिकेची आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत सुविधा व स्वच्छतेची तयारी पूर्ण झाली आहे, असे सासवडचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले. सासवड नगरपालिकेने पालखी काळात सासवड शहर आणि परिसरात कचरा संकलनासाठी 20 वाहने व 150 कर्मचारी नेमले आहेत. पालखीतळाची स्वच्छता, खांबावरील विजेचे दिवे, पालखी तंबूजवळ लाईटची व्यवस्था जनरेटरसह केली आहे.

हाय मास्टची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. भाविकांना दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावण्याची व्यवस्था केली आहे. पालखीतळावर महिलांसाठी व पुरुषांसाठी एकूण 32 सीट्स शौचालय व 16 सीट्स स्नानगृहे बांधण्यात आली आहेत. तसेच, ते अपुरे पडत असल्याने पालखीतळाशेजारील जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे फायबरचे महिला व पुरुषांसाठी 150 सीट्स शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. तात्पुरत्या स्वरूपात स्नानगृहाची उभारणी, त्यासाठी लागणारे पाण्याचे कनेक्शन घेण्यात आले आहे. पुणे व सातारा जिल्हा महावितरण कार्यालय यांना विद्युत पुरवठा अखंडितपणे राहण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.

सांगली : जीएसटी घोटाळाप्रकरणी पडताळणीला गती

पालखीतळ परिसरात 10 ठिकाणी तात्पुरती 10 कोंडाळी व पाण्याचे टँकर भरून देण्याची व्यवस्था पाणीपुरवठा केंद्र, हिवरे रोड, वीर रोड, वढणे वस्ती व बोरावके मळा येथे करण्यात आली आहे. तसेच टँकरमध्ये व सासवडच्या आसपास असलेल्या विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्याची व्यवस्था ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या काळात संपूर्ण सासवड शहरात सकाळी व संध्याकाळी ज्यादा पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सासवड नगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका व कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण यांनी दिली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीमधील पादुकांची महापूजा माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते दोन वेळा करण्यात येणार आहे. तसेच, संत सोपानदेव महाराज व संत चांगावटेश्वर पालखीचे सासवड येथून प्रस्थान होते. पालखीतळ, पाणीपुरवठा केंद्र व नगरपालिका कार्यालय याठिकाणी नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे. नगरपालिकेच्या वतीने दिवे नाका येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते. त्यासाठी मांडव व स्पिकर व्यवस्था, तसेच पालखीला निरोप देण्यासाठी जेजुरी नाका येथे मंडप व स्पिकरची व्यवस्था केली आहे, असे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले.

हेही वाचा

सांगली : जलशुद्धीकरणसाठी 53 लाखांची पावडर खरेदी होणार

अल्झायमरवर स्टेम सेल थेरपी?

इंदापुरात पालखी मुक्काम, विसाव्याच्या तळाची पाहणी; वैष्णव भक्तांना सोयी-सुविधा पुरवणार

Back to top button