राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रतापराव आहेर यांचे निधन | पुढारी

राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रतापराव आहेर यांचे निधन

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रतापराव महादेव आहेर,वय ७२ वर्षे यांचे शनिवारी (दि १८) निधन झाले. राजगुरूनगर सहकारी बँकेचे सहा वेळा अध्यक्ष, तसेच गेली सलग ४५ वर्षे ते संचालक पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा समीर व मुलगी,सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यावर शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

खेड तालुका आणि जिल्हा स्तरावर राजकीय,शिक्षण संस्था आणि सहकार क्षेत्रात ते अनेक वर्षे कार्यरत होते. खेड पंचायत समितीचे १२ वर्षे सदस्य, जिल्हा सहकारी बोर्डावर २० वर्षे संचालक, पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक मंडळ १० वर्षे संचालक, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, भीमाशंकर वाहतूक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, खेड तालुका सहकारी ऑईल मिल संस्थेचे अध्यक्ष, राजगुरूनगरच्या सिद्धेश्वर सहकारी सोसायटी मध्ये अनेक वर्षे संचालक तसेच शहरातील शिक्षण संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे पदाधिकारी म्हणून काम केले. राजगुरूनगर येथील भीमा नदी तीरावर दुपारी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Back to top button