शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी | पुढारी

शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

दापोडी : फुगेवाडी, कासारवाडी, दापोडी परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी केली. परिसरात वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती.

वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून बुंध्याला सुताचे फेरे घालतात. ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. भारत मातेचे नाव संपूर्ण विश्वात पसरू दे, वाईट प्रवृत्तीला दूर करून चांगल्या प्रवृत्तीचा विजय कर, सर्वांना दीर्घायुष्य व आरोग्य संपन्नता लाभो, अशी प्रार्थना महिलांनी केली.

धक्कादायक! व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ जण करत होते अत्याचार; तरुणीची आत्महत्या

वडाचे झाड दीर्घायुषी असते, त्याप्रमाणे आपला पतीही दीर्घायुषी राहावा, तसेच पती-पत्नीमधील मधुर नाते आणखी दृढ करण्यासाठी प्रत्येक सुवासिनीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची मनोभावाने पूजा केली. मंगळवारी सकाळपासूनच सुहासिनीमध्ये पूजेची लगबग सुरू होती. साजशृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला सात फेर्‍या घेऊन वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली.

त्यानंतर वडाच्या झाडाला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून दर्शन घेतले. घरी आल्यानंतर आपल्या गल्लीतील महिला एकत्र येऊन विविध गाणी तसेच सामूहिक नृत्य सादर केले. या वेळी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्यावतीनेआज वडपौर्णिमेनिमित्ताने सर्व महिलांना वडाचे झाड देण्यात आले. आज वडाच्या वृक्षारोपण करुन सांभाळ करण्याचे अवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

यवतमाळ : उमरखेडात टोळक्याचा तिघांवर प्राणघातक हल्ला

पिंपळे गुरव : नवर्‍याला उदंड आयुष्य लाभावे आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा असा वसा असणारा सौभाग्यवती महिलाचा वटपौर्णमा सण सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर साजरा करण्यात आला. वट पौर्णिमा सणानिमित्त परिसरातील महिलाची सकाळीपासून वडाच्या पूजेसाठी गर्दी पाहायला मिळाली. या वेळी महिलांनी पारंपरिक वेशात वड पूजेकरिता आंबे, गहू, फुले, हळद-कुंकू साहित्याने वडाची पूजा केली. तसेच, जनमोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना केली. या वेळी महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून आंब्याचे वाण दिले.

Back to top button