बारामतीत 11 लाखांचा गुटखा जप्त; शहर पोलिसांची कारवाई | पुढारी

बारामतीत 11 लाखांचा गुटखा जप्त; शहर पोलिसांची कारवाई

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल 11 लाखांचा गुटखा व दोन लाखांचे वाहन जप्त केले. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक, सहायक पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे व प्रकाश वाघमारे, पोलिस कर्मचारी तुषार चव्हाण, ठोंबरे, दळवी, कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शहरातील वसंतनगर बाजूकडून टीसी कॉलेजकडे जाताना मिशन हायस्कूलशेजारी एक अशोक लेलँड टेम्पो (एमएच 12 क्यूजी 8872) थांबलेला दिसला. पोलिस पथक त्यांचेजवळ जाताच त्या टेम्पोमधून संतोष गायकवाड व एक अज्ञात इसम हे दोघे जण मिशन हायस्कूलचे कंपाउंडवरून उडी मारून पळू लागल्याने पथकाने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी आवाज देऊनही ते अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले.

सापाने केली चक्क सापाचीच शिकार

अशोक लेेलँड टेम्पोची पाहणी केली असता सर्व पिशव्यांमध्ये गुलाम नावाचा गुटखा सापडला. पांढर्‍या पिशव्यांमधील तब्बल 11 लाखांचा गुलाम नावाचा गुटखा व दोन लाखांचा टेम्पो असा माल पोलिसांनी जप्त केला. पोलिस नाईक यशवंत ज्ञानदेव पवार यांनी संतोष गायकवाड यांचेविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.

Back to top button